पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा |आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन.

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा |आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन.

Born: 15 February 1963 (age 59 years)
Office: Member of Maharashtra Legislative Assembly since 2009
Party: Bharatiya Janata Party
Previous office: Member of Maharashtra Legislative Council (2004–2009)

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा |आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन
15/2/1963–03/1/2023

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठलं होत. त्यातून ते सुखरूप सुटतील अस वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “गेले अनेक वर्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरु होते. दिर्घ आजाराने आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची लोकप्रियता होती. आजारी असताना देखील विधीमंडळात निवडणुकीसाठी ते व्हिलचेअरवर आले होते.”

लक्ष्मण पांडुरंग जगताप हे पुणे शहरातील चिंचवड येथील राजकारणी आहेत. ते 2009 – 2014 साठी चिंचवडमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. ते सध्याचे चिंचवड आमदार M.L.A.होते.

चिंचवड मतदारसंघाचे आमदार अनेक दिवसांपासून आजारी होते, प्रकृती झपाट्याने ढासळत होती. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार


चिंचवडचे लोकप्रिय भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत आज मंगळवार सकाळी मालवली. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालाच्या शेजारील गावठाणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Copywrite protected !! Alert...